नंदुरबार : जिल्ह्यात ९ रूग्ण आढळले, दोघांचा मृत्यू

नंदुरबार : जिल्ह्यात ९ रूग्ण आढळले, दोघांचा मृत्यू

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू संख्या वाढतच असून रविवारी पुन्हा शहादा व नवापूर येथील दोन वृद्धांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकुण मयत संख्या 20 झाली आहे. पैकी 12 जण हे 60 वर्ष वयापेक्षा अधीक वयोगटातील आहेत. जूलै महिन्यात तब्बल 14 रूग्णांचा मृत्यू झाल्याने वाढता मृत्यूदर चिंतेचे कारण ठरत आहे. दरम्यान जिल्ह्यात आज कोरोनाचे 9 रूग्ण आढळुन आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 364 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आकडा आता चारशेच्या घरात पोहचला आहे. त्याच बरोबर मयतांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मृत्यूसंख्या केवळ 9 होती ती वाढून 20 पर्यंत गेली आहे. मयतांमध्ये सर्वाधिक वृद्धांचा समावेश आहे. एकुण 20 पैकी 12 जण हे 60 वर्ष वयापेक्षा अधीक वयोगटातील आहेत. शहादा येथील 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ते मुंबई येथे उपचारासाठी गेले होते. तेथेच ते पॉझिटिव्ह झाले होते. त्यांना 18 जुलै रोजी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा 19 रोजी मृत्यू झाला.

या शिवाय नवापूर येथील नारायणपूर रोड भागात राहणारे 72 वर्षीय वृद्ध देखील पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार घेतांना त्यांचा रविवार, 19 रोजी मृत्यू झाला. दिवसभरात एकुण दोन जणांचा मृत्यू झाला.याशिवाय गांधीनगर भागातील 53 वर्षीय बाधिताचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.

दरम्यान काल दिवसभरात नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नंदुरबारातील गांधीनगर येथील 42 वर्षीय पुरूष, चौधरी गल्लीतील 80 वर्षीय पुरूष तर 55 वर्षीय महिला,ज्ञानदिप सोसायटीमधील 44 वर्षीय पुरूष,मच्छीबाजारातील 28 वर्षीय पुरूष,संभाजीनगरमधील 54 वर्षीय महिला,नवापूरच्या नारायणपूर रोड परिसरातील 72 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून काल त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच नवापूर येथील जूनी महादेव गल्लीमधील 54 वर्षीय पुरूष तर नवापूर तालुक्यातील प्रतापपूर येथील 62 वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अद्यापपावेतो 365 जण कोरोनाबधित झाले आहेत. तर 2360 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.सद्यस्थितीत 120 जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून 213 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिलासा देणारे ठरले आहे. असे असले तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com