राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजपात प्रवेश

शनिमांडळ जि.प.गटातून उमेदवारी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजपात प्रवेश

नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress) जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी (Sagar Tamboli) यांनी आज भाजपात (BJP) प्रवेश केला असून तालुक्यातील शनिमांडळ जि.प.गटातून त्यांनी भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे.

जिल्हा परिषदेच्या ११ गट व १४ गणांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत आहे. त्यातच सदर निवडणुक रद्द होईल किंवा नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या दि.६ जुलै रोजी सुनावणी हेणार आहे.

त्यामुळे उमेदवारीबाबत मोजक्या नेत्यांच्या घरातील सदस्य वगळता इतर उमेदवार फारसे इच्छूक दिसत नाहीत. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य सागर तांबोळी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांनी शनिमांडळ जि.प.गटातून भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, (MP Dr. Heena Gavit) खा.डॉ.हीना गावित, दीपक पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com