पुलावरुन कार कोसळली ; दोन जण गंभीर जखमी
नंदुरबार

पुलावरुन कार कोसळली ; दोन जण गंभीर जखमी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नवापूर - Navapur - श.प्र :

येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर असलेल्या रायंगण शिवारातील पुलावरून सुमारे 70 फूट खाली नदीत कार कोसळल्याने चालकासह एक इसम गंभीर जखमी झाला आहे.

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या रायंगण शिवारातील सुमारे 70 फुट खोल पुलावरुन कार नदीपात्रात कोसळली. यात चालकासह एक युवक गंभीर जखमी झाला.

वाहन चालक शुभम राजेश पटेल (24) व विपुल गोपाल पटेल (28) अशी या जखमी युवकांची नावे आहेत. त्यांच्या कागदपत्रावरून ते जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. नवापूर येथील 108 रुग्णवाहिकेचे लाजरस गावित यांनी तात्काळ उपजिल्हारुग्णालय नवापूर येथे जखमींना दाखल केले.

चालकाला रायंगण गावातील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवलसिंग गावीत व नागरिकांनी बाहेर काढले. परंतु त्यांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने प्रकृती चिंताजनक आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com