71 हजाराची दारु जप्त
नंदुरबार

71 हजाराची दारु जप्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नवापूर - Navapur - श.प्र :

तालुक्यातील कारेघाट येथील जंगलात झाडाखाली उभ्या असलेल्या गाडीतून 71 हजाराचा मद्यसाठा पोलीसांनी जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.30 जुलैपर्यंत नवापूर, नंदुरबार, शहादा व तळोदा शहरात संचारबंदी असतांनाही अवैध धंद्यांना उत आला आहे. गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने महाराष्ट्रातून विविध शक्कल लढवून दारूची अवैध वाहतूक केली जात आहे. आज दुपारी दीड वाजता नवापूर तालुक्यातील कारेघाटच्या जंगलात झाडाखाली दारूने भरलेली गाडी उभी होती. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळताच तेथे छापा टाकला 71 हजाराचा अवैध दारूचा साठा या वाहनात आढळून आला.

महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात अवैध दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती केवळ एलसीबीला मिळते. तर स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाला का मिळत नाही? हादेखील संशोधनाचा विषय आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कर्मचारी महेंद्र नगराळे, शांतीलाल पाटील, जितेंद्र तोरवणे यांनी कारवाई केली.

चालकास वाहनात काय आहे या बाबत विचारपुस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तर दिली. सदर वाहनाचा संशय आल्याने तपासणी केली असता अवैध दारू दिसून आली. यात हेवर्डस 10 बॉक्स व सुगंधित संत्र्याचे 28 बॉक्स मिळून आले.गाडीसह या दारुची किमत साडे सात लाख असून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक अविनाश चौधरी (वय-28, रा. शास्त्रीनगर नवापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com