लाखोंचे अवैध सागवानी लाकूड जप्त

लाखोंचे अवैध सागवानी लाकूड जप्त

नवापूर - Navapur - श.प्र :

तालुक्यातील पिंपराण शिवारातील शेतात अवैधरित्या साठवून ठेवलेले सागवानी लाकूड, रंधा मशिन व इलेक्ट्रीक मोटर असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.

आज दि.25 नोव्हेंबर 2020 रोजी सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांना गुप्त बातमी मिळाली होती. त्यानुसार वनक्षेत्रपाल चिंचपाडा, वनक्षेत्रपाल नवापूर, वनक्षेत्रपाल खांडबारा यांच्यासह रेंज स्टाफ नवापूर व चिंचपाडा, खांडबारा, नंदुरबार तिन्ही रेंज स्टाफसह पिंपराण (खोच्यापाडा) ता.नवापूर येथे जावू छापा टाकला असता, योहान प्रभू गावीत याच्या शेतातील घरात अवैधरित्या रंधा मशीन व चिरकाम केलेला साग माल अस्ताव्यस्त कापसाच्या शेतात आंबाच्या झाडाजवळ आढळून आला.

सदर माल जप्त करून शासकीय वाहनाने शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला. सदर गुन्हयाबाबत वनपाल कामोद यांनी गुन्हा नोंद केला आहे.

या छाप्यात सागवानी लाकडाचे 275 नग, एक पलंग, अंदाजे घ.मी 1.25, एक रंधा मशीन इलेक्ट्रीक मोटारसह, एक डिझाईन मशीन इलेक्ट्रीक मोटारसह एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, विभागीय दक्षता अधिकारी धुळे, सहायक वनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कामोद पुढील तपास करीत आहेत.

ही कार्यवाही वनक्षेत्रपाल चिंचपाडा रेंज स्टाफ ,नवापूर रेंज स्टाफ, नंदुरबार रेंज स्टाफ, खांडबारा रेंज स्टाफ यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com