120 झाडांची तोड करुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न

पिंपळा येथील एकाविरुद्ध गुन्हा

नवापूर - Navapur - श.प्र :

120 झाडांची कत्तल करुन जंगलामध्ये अतिक्रमण करण्याच्या तयारीत असलेल्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 22 मार्चपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

दि.19 मार्च 2021 रोजी सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग प्रादेशिक वन्यजीव, वनक्षेत्रपाल चिंचपाडा यांच्यासह चिंचपाडा रेंज कर्मचारी गस्त करीत असताना नियत क्षेत्र पिंपळामधील कंपार्टमेंट नंबर 113 मध्ये रमेश जोद्या गावित हा इसम एक-दोन दिवसापासून अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने 120 झाडांची तोड करून जगासफसफाई करून, बुडे जाळपोळ करीत असतांना आढळून आला.

त्याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वन गुन्हा नोंद करून न्यायालय नंदुरबार येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 22 मार्चपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार धनंजय पवार,वनक्षेत्रपाल चिचपाडा आर.बी.पवार, वनपाल नितीन मंडलिक, युवराज भाबड वनरक्षक ईश्वर चौधरी, रामदास पावरा, दीपा कापडणीस, आशुतोष पावरा, तुषार नांद्रे, देवमन सूर्यवंशी, प्रवीण खैरनार, मनीषा जाधव, भानुदास वाघ, अरविंद निकम, कायम वनमजूर चामारिया गावित, रविदास गावित, वाहन चालक साहेबराव तुंगार आदींनी मेहनत घेतली.

सदर गुन्हयाचा पुढील तपास वनपाल खंडबारा व वनक्षेत्रपाल चिंचपाडा दी.वा.पगार वनसंरक्षक धुळे प्रादेशिक, सुरेश केवटे उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभाग, उमेश वावरे, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे धनंजय पवार सहायक संरक्षक नंदुरबार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

वन,वन्यजीव व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वन,वन्यजीव व पर्यावरणाचे कोणीही नुकसान करीत असेल तर सदर कृत्य बाबत तात्काळ वन विभागात 1926 टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com