नवापूर - Navapur - श. प्र :

मांडूळ तस्कर प्रकरणातील फरार जसुभाई बी. करादी ( रा.मोजलिया, ता.विजयनगर, जिल्हा साबरकाठ) याला अहमदाबाद येथून अटक केली आहे.

सदर कारवाईसाठी वन विभागाने सायबर सेल मेळघाट यांची मदत घेण्यात आली. सदर कारवाई ,

सहायक वनसंरक्षक नंदुरबार धनंजय जी पवार, वनक्षेत्रपाल नवापूर आर. बी. पवार, वनक्षेत्रपाल गस्तीपथक शहादा रत्नपारखे , वनरक्षक कल्पेश अहिरे ,वाहनचालक नंदुरबार स.स.तुंगार,वाहनचालक शहादा संजय वाघ आदींनी ही कार्यवाही केली.

सदर कार्यवाही ही वनसंरक्षक धुळे पगार , उपवनसंरक्षक शहादा केवटे , विभागीय दक्षता अधिकारी धुळे वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.