संतप्त जमावाने केली खांडबारा ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड

संतप्त जमावाने केली खांडबारा ग्रामीण  रुग्णालयाची तोडफोड
संतप्त जमावाने केली खांडबारा ग्रामीण  रुग्णालयाची तोडफोड
वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नवापूर तालुक्यातील झरीपाडा शिवारात विहिरीत पडलेल्या वयोवृध्दाला काढण्यासाठी विहीरीत उतरतांना जखमी झालेल्या इसमाला डॉक्टरांअभावी उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने खांडबारा ग्रामीण रूग्णालयातची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञात 18 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,नवापूर तालुक्यातील भादवड गावतील अर्जुनसिंग यांच्या झरीपाडा शिवारातील शेतात वयोवृध्द विजयसिंग वळवी यांचा मृतदेह काढण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

यावेळी शरद सोज्या नाईक रा.भादवड (ता.नवापूर) याने विहिरीत उडी मारल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने बेशुध्द झाला.

गंभीर जखमी झालेल्या बेशुध्द झाला. गंभीर जखमी झालेलया शरद नाईक यास उपचारासाठी खांडबारा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.

परंतु खांडबारा ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचाराअभावी शरद नाईक याचा मृत्यू झाल्याची आरोप करत संतप्त जामवाने ग्रामीण रूग्णालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केली.

यात टेबल खुर्च्या, औषधी बॉटलस फोडण्यात आली. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया कक्षातही मोठया प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटीलसह पोलीस पथक खांडबारा येथे दाखल होते. त्यांनी जामावाला पांगविले.

ग्रामीण रूग्णालयात तोडफोडीची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी खांडबारा ग्रामीण रूग्णालयात नुकसानीची पाहणी केली.

यावेळी खांडबारा ग्रामीण रूग्णालयात प्रशासन, ग्रामस्थांनी व मयत शरद नाईक यांच्या नातेवाईकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

108 रूग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने तसेच खांडबारा ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचार न मिळाल्यामुळे शरद नाईकचा मृत्यृ झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.

तर दुसरीकडे खांडबारा ग्रामीण रूग्णालय प्रशासनाने रूग्णालयात डॉक्टरसह सर्व स्टाफ उपस्थित होता.

परंतु रूग्णाचा रूग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर संतप्त जमावाने ग्रामीण रूग्णालयाची तोडफोड केल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली.

रूग्णवाहिका चालक यांना मारहाण केल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी रूग्णालयाच्या परिचालीका किरण देवरे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात 17 ते 18 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com