दिलीप गावित
दिलीप गावित
नंदुरबार

गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षण आपल्या दारी’

जि प शिक्षकाचा कौतुकास्पद उपक्रम

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

प्रेमेंद्र पाटील - Nandurbar- Navapur - नवापूर :

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होवु नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे.मात्र नवापूर तालुक्यातील बोरवण येथील नागरीक मजुरी करून पोट भरतात त्यांच्याकडे ऑनलाईन साठी सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत शिक्षक दिलीप गावित यांनी शक्षण आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबवत घरोघरी जावुन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे.नवापुर तालुक्यातील बोरवण येथे संपूर्ण आदिवासी समाजाचे लोक राहतात. येथील लोक शेतात मजुरी व बांबूच्या टोपल्या बनवतात. येथे इयत्ता पहिली ते चौथी जि प प्राथमिक शाळा बोरवण आहे. शाळेचा पट 35 व 2 शिक्षक आहेत जेमतेम तुटपुंज्या मजुरीवर जगणारे पालक आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नसतांनाही काही करू शकत नाही.

ऑनलाईन शिक्षण ,झूम मिटिंग,गुगल मिट याप्रमाणे अनेक उपाययोजना राबवत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी देखील आज ही अनेक गावात ,वाड्यावस्तीवर स्मार्टफोन,अँड्रॉईड टी व्ही एवढेच नव्हे तर मोबाईलला कवरेज रेंज देखील उपलब्ध नाही अशा ठिकाणच्या मुलांना कोणत्या पद्धतीने शैक्षणिक प्रवाहात आणावे हाच एक मोठा प्रश्न पडला आहे. नुकतेच रायगड येथून बदली होऊन आलेले ध्येयवेडे शिक्षक दिलीप नरशी गावित यांनी आपल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहिली. यावर मात करत कोरोनाच्या संकटात पालकांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी साहित्य घेणे परवडत नाही. तेव्हा या शिक्षकाने सोशल डिस्टंन्स मेंटेन करून थेट शिक्षण मुलांच्या दारी घेऊन जाण्याचा उपक्रम हाती घेतला. पालकांना व विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स मेंटेन करून गटागटाने अभ्यासाला बसवले.

जेणेकरून कोरोना च्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षकाने ऑफलाइन शिक्षण देण्याची शक्कल लढवली. व्हॉट्सअप वर आलेल्या व संगणकावर स्वतः तयार केलेल्या पीडीएफ चे एक पुस्तक तयार करून स्वतः झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना दिल्या. वेळोवेळी सोशल डिस्टन्स मेंटेन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व वह्या तपासण्याचे काम करतात. व शक्य होईल तेव्हा फोन करून मार्गदर्शन करतात. कारण एकाही पालकाकडे अँड्रॉइड स्मार्टफोन नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र पेज घेऊन विद्यार्थी दररोज काय करतो याची नोंद वही तयार करून नोंद ठेवली जाते. अशाप्रकारे शाळा बंद पण शिक्षण चालू ठेवले आहे. असे विद्यार्थ्यांच्या दारी शिक्षण पोहोचले आहे. पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना वह्या पेन व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप शिक्षकांनी स्वखर्चातून केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण सुद्धा दिले जाते उदाहरणार्थ चित्रकला, मातीकाम, रंगकाम व छोटे छोटे प्रयोग हेसुद्धा दिले जातात. याच बरोबर कोरोनाला घाबरून न जाता सोशल डिस्टन्स पाळावे, आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवावी., वेळोवेळी हात धुवावे. तोंडाला मास्क लावावे. व विनाकारण नाका तोंडाला स्पर्श करू नये. हेसुद्धा शिक्षण मुलांपर्यंत पोचवतात.

यासाठी गटशिक्षणाधिकारी चौरे, विस्तार अधिकारी पवार, केंद्रप्रमुख कदमबांडे व मुख्याध्यापिका श्रीम. यशोदा वसावे यांचे सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com