सव्वादोन लाखांचे मोबाइल लांबवले
नंदुरबार

सव्वादोन लाखांचे मोबाइल लांबवले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहरातील शास्त्री मार्केटमधील मोबाईल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल संचासह सुमारे सव्वा दोन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शास्त्री मार्केट व्यापारी संकुलातील संतोष इंदरलाल साहित्या यांच्या मालकीच्या गुडलक मोबाइल दुकानातून दि.15 रोजी रात्री चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर उचकावून आत प्रवेश केला.

दुकानातील 44 हजाराची रोकड व 1 लाख 72 हजार 738 रूपये किंमतीचे मोबाईल असा एकुण 2 लाख 16 हजार 738 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत संतोष साहित्या यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरत्यविरुध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिवटे, पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिर्‍हाडे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com