नंदुरबार : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हाेणार स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण

नगरपालिका इमारतीचेही ई-भुमिपूजन
नंदुरबार : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हाेणार स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण

नंदुरबार । प्रतिनिधी- NANDURBAR

येथील नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे ई-भुमिपूजन व स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचा ई-लोकार्पण सोहळा उद्या दि. 8 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे उपस्थित राहणार आहेत. येथील पालिकेची नुतन इमारत जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या नुतन इमारतीचे ई-भुमिपूजन उद्या दि. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता व नगरपालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण दुपारी 1.20 वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून खा. संजय राऊत, प्रमुख अतिथी म्हणून कृषि मंत्री दादा भुसे,आदिवासी विकास मंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी, धुळे जिल्हा पालकमंत्री अब्दुल सत्तार,

जि.प.अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी, खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,आ. सुधीर तांबे, आ.शिरीषकुमार नाईक, आ.राजेश पाडवी, शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आ. सौ. मंजुळा गावीत,

शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, आमश्या पाडवी, जि.प.उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत उपस्थित राहणार आहेत.

दोन्ही कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर येथे होणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, उपनगराध्यक्षा सौ.भारती राजपूत, बांधकाम सभापती दीपक दिघे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com