नंदुरबार जिल्हयाचा ८८.१३ टक्के निकाल
नंदुरबार

नंदुरबार जिल्हयाचा ८८.१३ टक्के निकाल

नाशिक विभागात सर्वात कमी निकाल

Ramsing Pardeshi

नंदुरबार | प्रतिनिधी- Nandurbar

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयाचा निकाल ८८.१३ टक्के लागला. नाशिक विभागात सर्वात कमी निकाल नंदुरबार जिल्हयाचा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी जिल्हयात एकुण २० हजार ८५२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयाचा एकुण निकाल ८८.१३ टक्के लागला. जिल्हयातील ४ हजार ३४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ७ हजार ८२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५ हजार ४८० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ हजार ३८ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले आहेत.

नवापूर तालुक्याचा सर्वाधिक निकाल

नंदुरबार जिल्हयाचा एकुण निकाल ८८.१३ टक्के लागला. यात सर्वाधिक निकाल हा नवापूर तालुक्याचा तर सर्वात कमी निकाल धडगाव तालुक्याचा लागला आहे. नवापूर तालुक्याचा निकाल ९३.४३ टक्के लागला. धडगाव तालुक्याचा निकाल ७८.४० टक्के लागला. तळोदा तालुक्याचा निकाल ७८.६८ टक्के लागला. शहादा तालुक्याचा निकाल ९२.४० टक्के, नंदुरबार तालुक्याचा निकाल ८७.९२ टक्के तर अक्कलकुवा तालुक्याचा निकाल ८६.०७ टक्के लागला.

Deshdoot
www.deshdoot.com