संभाव्य कोरोना लाटेसाठी नंदुरबार जिल्हा सज्ज

संभाव्य कोरोना लाटेसाठी नंदुरबार जिल्हा सज्ज

नंदुरबार । प्रतिनिधी Nandurbar

कोरोनाची तिसर लाट येणार अशी शक्यता आयसीएमआरने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यात येवू घातलेल्या या संभाव्य कोरोना लाटेसाठी नंदुरबार जिल्हा सज्ज असून, साधारण 500 ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन प्लांट उभारणी पूर्ण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात संकट आले तरी परतवू लागवू असा निर्धार प्रशासन करत आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षात शिरकाव करणार्‍या कोरोनाने मार्च 2021 मध्ये रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. रूग्णसंख्या हजारोंच्या घरात गेल्यानंतर उपचारांसाठी बेड मिळणे मुश्किल झाले होते. यावर मात करत जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने नंदुरबार जिल्हा रूग्णालय व कोविड केअर सेंटर्स याठिकाणी 1 हजार 25, तर तालुकास्तरावर 900 असे 1 हजार 900 बेड निर्माण करत रूग्णांना उपचार देणे सुरू केले होते.

सात शासकीय रूग्णालये, 9 कोविड केअर सेंटर्स अविरत सुरू राहिल्याने कोरोनाची दुसरी लाट आटोकयात आणली गेल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आता येवू घातलेलया तिसर्‍या संभाव्य लाटेचा धोका असल्याने रूग्णालयात ऑक्सिजन वाढीवर भर देण्यात आला आहे. यातून जिल्हा रूग्णालयात 350 बेडसाठीचा लिक्विड ऑक्सिंजन प्रकल्प पूर्णत्वास आला असून, हा प्रकल्प दोन दिवसात सुरू होणार आहे. सोबतच ग्रामीण रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बेड वाढीवर भर दिला जात आहे.

बालकांसाठी 20 बेडचा वॉर्ड

आयसीएमआरने संभाव्य तिसरी लाट ही लहान बालकांना बाधा करणारी ठरेल असा अांज वर्तवला आहे. यामुळे काळजी घेणच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हा रूग्णालयाच्या जुन्या नेत्र कक्षात 20 बेडचा पेडीयाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आला आहे. येथे सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. केवळ कक्षात म्हणून हा वॉर्ड तयार करण्यात आला असून पालकांनी घाबरून न जाण्याचेही आरोग्य प्रशासनाने कळविले आहे.

जिल्हा रूग्णालयात सध्या असलेल्या बेडची संख्या वाव भर देण्यात येत आहे. महिलांसाठी असलेल्या जुन्या इमारतीतील नर्सिग वॉर्डात 100 तसेच आणखी एका वॉर्डात 100 बेड तयार करन कोरोनाबाधितांना त्याठिकाणी उपचार देण्यात येणार आहे. गर्भवती मातांसाठी दुसरा सज्सज् असा कक्ष तयार कर ण्यात आला आहे.

दरम्यान जिल्ह्यात सर्व 13 ग्रामीण रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन काँस्ट्रेटर वाटप करून त्याचा वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे. ग्रामीण रूग्णालयात खाटा वाढीव भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातपुडयात दुर्गम व अति दुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण वाढीव देण्यात येत आहे. सोबतच वाढीव खाटा तसेच विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com