नंदुरबार

ग्रा.पं.च्या आचारसंहितेमुळे कर्जमाफी प्रक्रियेतून नंदुरबार जिल्हा वगळला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

महाविकास आघाडी शासनातर्फे कर्जमाफी प्रक्रियेच्या दुसर्‍या टप्प्याला उद्या दि.29 पासून सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र, या कर्जमाफी प्रक्रियेत राज्यातील 19 जिल्हयातील शेतकर्‍यांना वगळण्यात आले असून त्यांना आता दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. यात नंदुरबार जिल्हयाचाहि समावेश आहे. जिल्हयातील 38 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची आचारसंहिता सुरु झाल्याने शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार आहेत.

महाविकास आघाडी शासनाने शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारकडून 15 हजार लाभार्थी शेतकर्‍यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या कर्जमाफीतून तुर्त 19 जिल्हयांना वगळण्यात आले आहे. यात नंदुरबार जिल्हयाचाही समावेश आहे.

जिल्हयातील 38 ग्रामपंचायतींची निवडणुक प्रक्रिया सुरु झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या कारणामुळे शेतकर्‍यांना आता दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी निराश झाले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com