नंदुरबार : जिल्ह्यात १२ नवे रुग्ण
नंदुरबार

नंदुरबार : जिल्ह्यात १२ नवे रुग्ण

१५ जणांची कोरोनावर मात

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar :

नंदुरबार जिल्हयात आज 12 नवे रुग्ण आढळले असून 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आज सलग पाचव्या दिवशी कोरोनो रुग्णाचा मृत्यू झाल्याने मयत रुग्णांची संख्या 17 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात आज पुन्हा 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबारातील अंबिका कॉलनीतील 36 वर्षीय पुरुष, चौधरी गल्लीतील 65 वर्षीय व 57 वर्षीय पुरुष, जयनगर ता.शहादा येथील 23 वर्षीय तरुण, गरीब नवाज कॉलनी शहादा येथील 60 वर्षीय व 50 वर्षीय पुरुष, खेतिया रोड शहादा येथील 50 वर्षीय पुरुष, नाशिंदे ता.नंदुरबार येथील 25 वर्षीय तरुण, सरोजनगर नंदुरबार येथील 56 वर्षीय पुरुष, परदेशीपुरा नंदुरबार येथील 58 वर्षीय पुरुष, जुनीभोई गल्लीतील 60 वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली नंदुरबार येथील 80 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

दरम्यान, आज 15 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात नंदुरबार तालुका वैद्यकीय अधिकारी, हुडको कॉलनी नंदुरबार, आशीर्वाद कॉलनी नंदुरबार, भाट गल्ली नंदुरबार, नागाईनगर नंदुरबार, राजीव गांधीनगर नंदुरबार, देसाईपुरा नंदुरबार, सरस्वतीनगर नंदुरबार, जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचारी, तोरखेडा ता.शहादा, गेंदामाळ ता.धडगाव, पोलीस लाईन अक्कलकुवा यांचा समावेश आहे.

दरम्यान, दि. 16 जुलै रोजी कुंभार गल्ली शहादा येथील 74 वर्षीय पुरुषाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची रॅपीड अँटीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. तसेच त्याची हृदय शस्त्रक्रियादेखील झाली होती. आज सकाळी 10 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यामुळे जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com