व्यापार्‍याच्या चारचाकी वाहनातून पैसे चोरणार्‍या 4 जणांना अटक

व्यापार्‍याच्या चारचाकी वाहनातून पैसे चोरणार्‍या 4 जणांना अटक

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

तळोदा येथील व्यापार्‍याचे चारचाकी वाहनातून 1 लाख 10 हजार रुपये चोरणार्‍या 4 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.5 जुलै रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तळोदा येथील किराणा मालाचे व्यापारी हुकुमचंद घिसुमल जैन हे त्यांच्या चारचाकी वाहनाने तळोदा येथुन खापर व अक्कलकुवा येथुन त्यांना दिलेल्या मालाचे पैसे घेवून निघाल्यानंतर अक्कलकुवा येथील आमलीबारी फाट्याजवळ पंक्चर दुकानावर अज्ञात इसमांनी हुकुमचंद जैन यांच्या गाडीतील रेग्जीनच्या बॅगमध्ये ठेवलेले 1 लाख 10 हजार रुपये रोख चोरुन नेले. म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात हुकुमचंद घिसुमल जैन यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

करोना महामारीमुळे व्यापार्‍यांची हलाखीची परिस्थीती होती, त्यातच व्यापार्‍याचे दिवसा 1 लाख 10 हजा रुपये चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते,

त्याअनुषंगाने पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत गांभीर्याने चर्चा करुन गुन्हा उघडकिस आणुन गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन अन्वेषण शाखेचे पथक तयार केले. पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांचे सहाय्याने लक्कडकोट येथुन सुनिल खारक्या पाडवी रा. लक्कडकोट ता.तळोदा यास शिताफीने ताब्यात घेतले.

त्याची विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार रणजित रतिलाल वळवी, युवराज करमसिंग वळवी दोन्ही रा. लक्कडकोट ता. तळोदा , वसंत शेगा पावरा रा. रोझवा पुनर्वसन यांच्या मदतीने केली असल्याची हकिगत कळविल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सर्व आरोपीतांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांसह ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी देखील गुन्हा केल्याचे कबुल केल्याने सर्व आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

तसेच गुन्ह्यात चोरीस गेले रोख रुपये देखील लवकरात लवकर आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात येतील असे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कळविल आहे.

सदरची कामगिरी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (गृह) देवराम गवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, असई अनिल गोसावी, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक विशाल नागरे, सुनिल पाडवी, बापु बागुल, मनोज नाईक यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com