गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

नंदुरबार येथील धुळे चौफुली येथे शहर पोलिसांची कामगिरी
गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

शहरातील धुळे चौफुली परिसरात शोध पथक पोलिसांनी सापळा रचून विना परवाना गावठी कट्ट्या सह दोन जणांना अटक केले आहे

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी गुप्त बातमीच्या आधारे नंदुरबार शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या आदेशावरून शोध पथक मधील अतुल बिराडे,राहुल पांढारकर,हेमंत बारी आणि भटू धनगर यांनी नंदुरबार शहरातील धुळे चौफुली या ठिकाणी सापळा रचून एका रिक्षेत दोन संशयिताची चौकशी केली असता त्यांच्या कडे एक गावठी कट्टा आढळून आला .

गौरव विनोद सोनार आणि रिक्षा चालक उदय राजेंद्र मराठे या दोघांना पोलिसांनी अटक केले असून त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे या प्रकरणी शहर पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांनी माहिती दिली आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com