ट्रक अडवून चालकाचे हातपाय बांधून २७ लाखांच्या साडया लंपास

दहिवेलनजिकची घटना, चौघा इसमांविरुद्ध गुन्हा
ट्रक अडवून चालकाचे हातपाय बांधून २७ लाखांच्या साडया लंपास

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

ट्रक अडवून चालकाचे हातपाय बांधून ट्रकमधील २७ लाख ३२ हजार ९२३ रुपयांचे साडया व ड्रेस मटेरीयल जबरीने चोरुन नेल्याची घटना सुरत-नागपूर महामार्गावर दहिवेल गावाजवळ घडली. याप्रकरणी चौघा अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.६ ते ७ जुलै दरम्यान पन्नालाल नन्हेलाल चंद्रवंशी (चालक, ग्रामपायली खुर्द पो.सादकशिवनी ता.छपरा जि.शिवरी, मध्यप्रदेश, ह.मु.दत्तवाडी, नागपूर) हा त्याच्या मालकीची ट्रक (एमएच ४०-वाय ४३१९) ने सुरत सारोली

येथून माल घेवून नागपूरकडे जात होता. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी त्यांच्या ट्रकला ओव्हरटेक करुन ट्रक दहिवेल गावाजवळ अडविली. चालकाला धमकावून त्याचे हातपाय बांधले व ट्रकमधील २७ लाख २२ हजार ४२३ रुपये किमतीच्या वेगवेगळया कंपनीच्या साडया,

सलवार, ड्रेस मटेरीयल पळविले. पाचशे रुपये किमतीचा मोबाईल व १० हजार रुपये रोख असा एकुण २७ लाख ३२ हजार ९२३ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.

याबाबत पन्नालाल चंद्रवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विसरवाडी पोलीस ठाण्यात चौघा अज्ञात इसमांविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४१, ३४२, ५, ६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एस.शिंपी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com