सुलतानपुर फाट्यावर एकास गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

सुलतानपुर फाट्यावर एकास गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

म्हसावद - Mhasawad - वार्ताहर :

सुलतानपुर ता.शहादा फाट्यावर एकास गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

संशयीत आरोपी धीरज गणपत कुवर (कोळी) रा.भवानी चौक शहादा हा म्हसावद पोस्टे हद्दीत सुलतानपुर फाटा परिसरात सार्वजनीक जागी 25 हजार रूपये किंमतीची एक गावठी बनावटी लोखंडी पिस्तुल एक मँगझिन रिकाम्या स्थितीत संशयीत आरोपी धीरज गणपत कुवर (कोळी) यांच्या कब्जात शर्टाचे खाली पॅन्टचा उव्या बाजुस कंबरेला खोचलेले खालील वर्णनाचे गावठी पिस्तुल मिळुन आले.

आरोपी याने आपल्या कब्जात विनापरवानगी गैरकायदा वरील वर्णनाचा व किंमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल कब्जात बाळगतांना मिळून आला असून म्हसावद पोलीसात भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3,5 चे उल्लगन 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात करून त्याला अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com