25 हजारांची विज चोरी केल्याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा

25 हजारांची विज चोरी केल्याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

वीज वितरण कंपनीच्या वाहिनीवर आकडे टाकून 1032 युनिटची वीज चोरी करत 24 हजार 364 रुपयांचे नुकसान करणार्‍या तिघा वीज ग्राहकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील बागवान गल्ली येथील रहिवासी शकील शाह शकूर शाह फकिर याने वीज वितरण कंपनीच्या लघुदाब वाहिनीवरील आकडे टाकून 486 युनिटची चोरी केली वीज वितरण कंपनीचे 7 हजार 318 रुपयांची वीज चोरी केली.

तसेच बिलाडी रस्त्यावरील रहिवासी रवींद्र माळी यांनी सुद्धा वीज वितरण कंपनीच्या वाहिनीवर आकडे टाकून 195 चोरी केली.तसेच नंदुरबार शहरातील बागवान गल्ली येथील रहिवासी नुरशहा फकिर शकूर शाह याने देखील वीज वितरण कंपनीच्या लघुदाब वाहिनीवरील आकडे टाकून 351 युनिटची चोरी केली वीज वितरण कंपनीचे 6 हजार 188 रुपयांची वीज चोरी केली.

म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता विकास सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरून शाकीर शहा शकूर शहा फकीर,रवींद्र माळी, नुरशहा फकिर शकूर शाह तिघे रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम 2003 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पीएसआय स्नेहदीप शिंदे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com