५ वर्षीय बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न

आरोपी वर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून केली अटक
५ वर्षीय बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एका पाच वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे.

त्याअंतर्गत नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येवून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील आरोपी अनिल आत्माराम गुरुबक्षांनी वय 40 यांच्या दुकानावर सदर मुलगी पान मसाला चॉकलेट घेण्यासाठी आली असता आरोपी ने तिला घरात बोलावले व तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने हा प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यामुळे मुलीच्या परिवाराने पोलीस स्टेशन गाठले व मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध आयपीसी 370 व पोक्सो अतर्गत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी ला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी सचिन हिरे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com