१८ वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून

१८ वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून खून

संशयित आरोपी फरार

म्हसावद, ता.शहादा - Shahada - वार्ताहर :

उमर्टी, ता.शहादा येथील अठरा वर्षीय तरूणीचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह गावाजवळच ऊसाचा शेतात फेकून दिल्याची घटना घडली.

याबाबत म्हसावद पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनातील आरोपी फरार आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊमर्टी, ता.शहादा येथील मयत तरूणी लक्ष्मी युवराज ठाकरे (१८) हीचा मृतदेह सोमवारी दुपारी उमर्टी शिवारात मोहन रोहिदास जाधव, पुंजरू रोहीदास जाधव यांच्या गट नंबर ५३ ऊसाच्या शेतात आढळून आला.

तरूणीच्या अंगावर चांदीचे दागदागीने होते. गळ्यातील चांदीची साखळी काढून नेण्यात आली आहे. हातातील दाग-दागिनेही काढायचा प्रयत्न आरोपीने केल्याचे समजते. मात्र खून हा चोरीच्या ऊद्देशाने झाला की अन्य कोणत्या कारणामुळे हे मात्र समजू शकले नाही.

मयत तरूणीच्या डोक्यावर, तोंडावर, कानाजवळ दगडाने दुखापत करून जिवे ठार मारून फेकून दिले आहे. याबाबत मयताची आई जिजाबाई युवराज ठाकरे (३६) यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी दिलीप तुम्बा चोंगळे रा.उमर्टी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना घडल्यापासून आरोपी फरार आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत शहादा यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिराडे म्हसावद पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com