घरफोडीप्रकरणी एकास गुजरात राज्यातून अटक

पावणे चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत
घरफोडीप्रकरणी एकास गुजरात राज्यातून अटक

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील झामणझर येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेकडून उकल झाली असून गुजरात राज्यातून 3 लाख 62 हजाराच्या मुद्देमालासह आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, झामणझर ता.नवापूर येथे दि.29 मार्च 2021 रोजी महेशभाई मंजीभाई प्रजापती यांच्या राहत्या घरातील भिंतीच्या विटा काढून चोरटयांनी घरातील भिंतीलगत असलेल्या देवघरातून लोखंडी गोदरेज कपाटाची चावी काढुन चावीने कपाट उघडुन सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली होती. याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्यामार्फत सुरु होता. यासाठी श्री.राजपूत यांनी पोना जितेंद्र ठाकुर, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे यांचे पथक स्थापून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला.

सदर गुन्हा ग्रामिण भागात तसेच राज्याचे सिमावर्ती परिसरात घडलेला असल्याने तपासासाठी आव्हानात्मक होता. गुन्हयातील आरोपी गुजरात राज्यातील माहुवा (हातावाडफळी) येथील असल्याची गोपनिय माहिती पथकाने काढुन ते मागावर होते. दि.13 मे 2021 रोजी आरोपी त्याच्या गावी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने पथकाने वेशांतर करुन आरोपीच्या गावात सापळा लावला. कौशलभाई सुरेशभाई ओड यास अटक करण्यात आली. त्याला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता गुन्ह्याची कबुली दिली.

तसेच त्याने चोरी केलेला 3 लाख 62 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल काढून दिला. आरोपीने गुन्ह्याची कबूली दिल्याने मुद्देमालासह आरोपीस पुढील तपासकामी नवापूर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहेत.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाख़ेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोना जितेंद्र ठाकुर, जितेंद्र तोरवणे, पोकॉ मोहन ढमढेरे यांच्या पथकाने पार पाडली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com