जुगार खेळणार्‍या सहा जणांवर गुन्हा

रोकड व तीन दुचाकीसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त
जुगार खेळणार्‍या सहा जणांवर गुन्हा

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

शहादा तालुक्यातील प्रकाशा-नंदुरबार रस्त्यालगत जुगार खेळणार्‍या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून रोकडसह तीन दुचाकी असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील प्रकाशा-नंदुरबार रस्त्यालगत एका बंद घराच्या आडोश्याला दीपक शांताराम गुरव, सुभाष चिंधा बरडे, विजय सुभाष मराठे, रोहन हेमंत मुसळदे, प्रकाश नारायण शिंपी व आदित्य हेमंत मुसळदे हे सहा जण 52 पत्त्यांचा जुगार खेळतांना व खेळवितांना साधनासह आढळून आले.

तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत तोंडाला मास्क न लावता कोरोना संसर्ग पसरविण्याचे हयगयीने कृत्य करतांना आढळून आले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 7 हजार 310 रुपयांची रोकड व जुगाराची साधने तसेच 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.39 क्यू 8097), 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.39 एए 4794), 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.39 ए 9397) असा एकूण् 97 हजार 610 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोशि जयेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ, भादंवि कलम 268, 269, 290 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुनिल पाडवी करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com