क्षुल्लक कारणावरून एकाचा खून

इंद्रीहट्टी येथील घटना, तिघांना अटक
क्षुल्लक कारणावरून एकाचा खून

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

अंडर पँटवर बाहेर बसल्याचा राग आल्याने एकाला जबर मारहाण करुन जमिनीवर आपटून खून केल्याची घटना तालुक्यातील इंद्रीहट्टी येथे घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ मे रोजी बारकू डक्कर ठेलारी (वय ३९, रा.इंद्रीहट्टी ता.नंदुरबार) हा सकाळी १० वाजेच्या सुमारास घरासमोरील मोरीत आंघोळ करुन अंडरपँटवर बाहेर ओटयावर बसला.

त्यावेळी शेजारी राहणार्‍या शंकर पावबा भिल, त्याची पत्नी मराबाई शंकर भिल व मुलगा महेंद्र शंकर भिल यांनी दोन दिवसांपुर्वी झालेले भांडण उकरुन काढून बारकू ठेलारी याला अंडरपँटवर नेहमी बाहेर का बसतो असे विचारत लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.

तसेच हवेत उचलून जोरात जमिनीवर आपटले. त्यामुळे बारकू ठेलारी याचा मृत्यू झाला.

याबाबत लहानीबाई बारकू ठेलारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शंकर भिल, मराबाई भिल, महेंद्र भिल यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com