अक्कलकुवा तालुक्यातील फरार आरोपी 18 दिवसानंतर जेरबंद

सुरत जिल्ह्यातील भेस्तान येथुन घेलले ताब्यात
अक्कलकुवा तालुक्यातील फरार आरोपी 18 दिवसानंतर जेरबंद

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

मोलगी पोलीस ठाण्यातील आरोपीला अक्कलकुवा न्यायालयात सुनावणीसाठी घेवुन जात असतांना आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देवुन हतकडी सह फरार झाला होता.

पोलीस पथकाने सुरत जिल्ह्यातील भेस्तान येथुन तब्बल 18 दिवसानंतर अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.6 एप्रिल 2021 रोजी अक्कलकुवा न्यायालयात मोलगी पोलीस ठाण्यातील कलम 457, 380 34 मधील आरोपी दिनेश रायसिंग वळवी रा. वलंबा यास सुनावणीसाठी आणले असतांना पोलीस पथकाची नजर चुकवुन तो बेडीसह पळुन गेला होता.

सदर आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना आदेशीत केले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे 3 पथके तयार करुन आरोपीचा ठाव ठिकाणा काढण्यासाठी तपास सुरु केला.

गोपनिय बातमीदार सक्रीय केले. दि.24 एप्रिल 2021 रोजी गोपनिय बातमीदारामार्फत प्राप्त झालेल्या माहीतीनुसार पोहवा सजन वाघ, पोना विकास अजगे, किरण पावरा यांचे पथकाने भेस्तान जिल्हा सुरत येथे जाऊन माहिती मिळवुन शिताफिने सापळा रचुन दिनेश रायसिंग वळवी याला जेरबंद करुन पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाख़ेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, पोहवा सजन वाघ, विकास अजगे, किरण पावरा यांच्या पथकाने पार पाडली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com