दीड लाखाच्या चोरीप्रकरणी एकास मध्यप्रदेशातून अटक

दीड लाखाच्या चोरीप्रकरणी एकास मध्यप्रदेशातून अटक

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

खांडबारा गावात लॉकरची चावी बनवितांना केलेल्या चोरीतील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील खरगोन येथे जेरबंद केले असून त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी विसरवाडी पोस्ट हद्दीतील खांडबारा गावातील कुसुमबाई जगताप यांच्या राहत्या घरात एका अज्ञात इसमाने कपाटाच्या लॉकरची चावी बनवण्याची बहाण्याने लॉकर मध्ये असलेली एकूण 1 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात भा.दं.वि कलम 420, 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी पोहवा विनोद जाधव, पोना राकेश वसावे, राजेंद्र काटके, विकास अजगे, अभय राजपुत यांचे पथक तयार केले.

सदर गुन्ह्याची पध्दत ही शिकलीकर आरोपींची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खांडबारा गावातील काही सीसीटीव्हींमधील फुटेज पाहुन आरोपी ललकारसिंग जलसिंग शिकलीकर रा. एकता नगर, नंदुरबार हा असल्याचे निष्पन्न झाले होते.

आरोपीने पोलीस पथकास गुंगारा देत मध्यप्रदेशात पलायन केले होते. तेव्हापासुन पथक आरोपीचे मागावर होते.

अखेर दि.10 एप्रिल 2021 रोजी सदर आरोपी हा खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा गावात असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने पथकाने तात्काळ भगवानपुरा गाव गाठले. गावात वेषांतर करुन आरोपीचे ठाव ठिीकाण्याबाबत माहीती काढुन आरोपीस सापळा रचुन जेरबंद केले.

त्याची विचारपूस केली असता त्याने खांडबारा गावात केलेल्या चोरीची कबुली दिली. त्यामुळे आरोपीस पुढील तपासकामी विसरवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, विजयसिंह राजपुत, पोहवा विनोद जाधव, पोना राकेश वसावे, राजेंद्र काटके, विकास अजगे, अभय राजपुत यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com