नंदुरबारातील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

10 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
नंदुरबारातील घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार शहरातील राजसारथी नगरात झालेल्या घरफोडीचे गुन्ह्याची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडुन उकल करण्यात आली असून दोघांकडून चोरीच्या टीव्हीसह 10 हजारात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि.6 एप्रिल 2021 रोजी राजसारथी नगरात राहणारे किशोर जयदेव पाटील यांच्याकडे घरफोडी होऊन 32 इंची टीव्हीसह 9 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी पोना राकेश मोरे, सुनिल पाडवी, दादाभाई मासुळ, पोकॉ अभय राजपुत, आनंदा मराठे यांचे पथक नेमले होते.

या पथकाने दि. 14 रोजी किरण दगा ठाकरे रा. पातोंडा व राज नारायण थनवार रा. मेहतर वस्ती यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता दोघांनी मिळुन राजसारथी नगरात घरफोडी केल्याची कबुली दिली.

गुन्ह्यात चोरलेला 7 हजार रुपये किमतीचा एक 32 इंची एलएडी टीव्ही तसेच 7 हजार 100 रुपये किमतीचे चांदीचे दागिने काढुन दिले. दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, विजयसिंह राजपुत, पोना राकेश मोरे,सुनिल पाडवी, दादाभाई मासुळ, पोकॉ अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com