नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्ह्यात जप्त केलेली चारचाकी वाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्ह्यात जप्त केलेली चारचाकी मालवाहु वाहन (क्र.एम.एच.10- ए.डब्ल्यु. 70) ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मागील बाजूस लावलेली असतांना अज्ञात चोरटयांनी पाच लाख रूपये किंमतीचे वाहन दि.10 ते 17 मार्च दरम्यान लंपास केले.

याप्रकरणी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शैलेंद्र दत्तात्रय मराठे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई मुकेश पवार करीत आहेत.