नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा तंबाखुची जिल्ह्यात होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्ष्यात घेवुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईचा धडाका लावला असुन तिन दिवसात गुटखा विक्रीवर छापे टाकत 7 लाख 1 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करर्यात आला आहे.याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीचे प्रमाण लक्ष्यात घेवुन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा तंबाखुची होणारी अवैध चोरटी विक्री व वाहतुकीवर कारवाईची विशेष मोहिम राबविण्याबाबत निर्देश दिले.

यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजुपत यांनी अमंलदारांचे वेग-वेगळे पथक तयार करुन विमल गुटखा तंबाखुची अवैध विक्री व वाहतुक करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

पथकांनी दि.4 मार्च पासुन आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील विमल गुटखा तंबाखु अवैध चोरटी विक्री व वाहतुकीवर धडक कारवाई सुरू केली आहे.

यात धडगांव, तळोदा सारंगखेडा, शहादा, मोलगी, अक्कलकुवा, नंदुरबार तालुका व नवापुर पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये आता पर्यंत 10 केसेस व 7 लाख 1 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी 10 आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी संबंधीत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. तसेच यापुढे ही महाराष्ट्रात बंदी असलेला विमला गुटखा तंबाखुची अवैध चोरटी विक्री व वाहतुकीवर प्रभावी कारवाई करण्याची विशेष मोहिम सुरु राहिल. असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत व त्यांच्या पथकाने केली आहे.