नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार शहरातील कंजर वाडा परिसरात आज सायंकाळी पोलिसांनी छापा टाकून तीन लाख 75 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज दि. २५ डिसेंबर २०२० रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रविंद्र कळमकर यांना बातमी मिळाली की , एक इमस नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरात बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे.

त्यानुसार , शहर प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार , प्रभारी उप विभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोउनि सुनिल बिऱ्हाडे, पोहेकॉ रविद्र पवार , पोहेकॉ अतुल बि-हाडे, पोहेकॉ संदीप गोसावी , पोना भटू धनगर , पोकॉ हेमंत बारी , पोकॉ अनिल बडे , पोकॉ कल्पेश रामटेके , पोकॉ इम्रान खाटीक , पोकॉ विजय नागोडे , मुद्देमाल कारकून पोहेकॉ अशोक बहिरम यांनी रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचून ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ५ किलो ६०० ग्राम सुका गांजा जप्त केला.

याप्रकरणी शहानवाज खान जाफर खान पठाण ( बेरीचौडा विधी , शिवालयम विधी जवळ , विजयनगरम , खादरनगर , आंध्र प्रदेश) व दुचाकीस्वार इसम सुदाम रमेश टिळंगे (रा. कंजरवाडा , नंदुरबार) यांना ताब्यात घेतले आहे.

पोउनि सुनिल बि-हाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एन.डी.पी.एस. अक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.