नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार शहरातून चोरीस गेलेली 60 हजाराची बजाज कंपनीची मोटरसायकल नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 1 डिसेंबर रोजी दोंडाईचा येथील किरण पंडित गोसावी यांच्या मालकीची मोटर सायकल,नंदूरबार शहरातील बस स्थानक परिसरात अज्ञात इसमाने चोरून नेली होती, याबाबत किरण गोसावी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सदरच्या मोटर सायकल चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी करीत असताना, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरची मोटर सायकल, संजय नगर येथे राहणार्या महेश कासार याने चोरली असून ती स्वतःह वापरीत आहे.

या बातमीबाबत खात्री करण्यासाठी स्थागुअशा चे पथक संशयीत आरोपी राहत असल्या परिसरात पाठवल्याने महेश कासार मोटारसायकल जवळ उभा असलेला दिसल्याने,त्यास त्याच्या ताब्यात असलेल्या गाडी बाबत विचारपूस केली असता, त्याने आधी उडवा उडवीचे उत्तरे दिली, परंतु पोलीसांनी आरोपितास आपल्या खाक्या दाखविताच,संशयीत आरोपी सदर गाडी बस स्टँड परिसरातून चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने, गाडी जप्त केली.

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षकमहेंद्र पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत,व पथकातील पोना राकेश मोरे, दादाभाई मासूळ,पोशी अभय राजपूत,आनंद मराठे यांनी केली आहे.