नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार शहरातील नवशक्ती कॉम्प्लेक्समधील दुकानातून अडीच लाखाचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली.

याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहर स्टेशनरोडवर असलेल्या नवशक्ती कॉम्प्लेक्स संजय टाईम्स नावाची दुकानात एकाने प्रवेश करत 2 लाख 49 हजार 799 रूपये किंमतीचे नवीन व जुने मोबाईल लंपास केले.

याप्रकरणी शंकर नानोमल मंदाणा रा.नवी सिंधीकॉलनी (नंदुरबार) यांच्या फिर्यादीरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गोपी गोविंद काठीवाडी रा.संगमटेकडी (नंदुरबार) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि डी.एस.शिंपी करीत आहेत.