अक्कलकुवा तालुका करोनामुक्त

जिल्हयात आता केवळ 48 रुग्ण
करोनामुक्त
करोनामुक्त

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हयातील अक्कलकुवा तालुका करोनामुक्त झाला आहे. या तालुक्यात दाखल असलेला अखेरचा रुग्ण करोनामुक्त झाला आहे.

दरम्यान, आज जिल्हयातील 21 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 48 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.

जिल्हयात आतापर्यंत 2 लाख 14 हजार 35 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 37 हजार 659 रुग्ण करोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यापैकी 36 हजार 661 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 947 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज जिल्हयातील 21 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. या तालुक्यात दाखल असलेला करोनाचा अखेरचा एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

सद्यस्थितीत नंदुरबार तालुक्यात 32, शहादा व तळोदा तालुक्यात प्रत्येकी 4 व नवापूर तालुक्यात 8 अशा एकुण 48 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. धडगाव तालुक्यात गेल्याच आठवडयात कोरोनामुक्त झाला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com