जिल्हयातील 465 ग्रामपंचायती करोनामुक्त

उर्वरित 24 ग्रामपंचायतींमध्ये 47 कोविड रुग्णांवर उपचार सुरु
जिल्हयातील 465 ग्रामपंचायती करोनामुक्त
करोनामुक्त

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हयातील 489 पैकी 465 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित 24 ग्रामपंचायतींमध्ये 47 करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

धडगावातील सर्व 34 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत. लवकरच जिल्हयातील ग्रामीण भाग कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्यातील 489 ग्रामपंचायती करोनाबाधीत झाल्या होत्या. यापैकी 465 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

उर्वरित 24 ग्रामपंचायतींमध्ये 47 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार तालुक्यातील 135 पैकी 126 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित 9 ग्रामपंचायतींमध्ये 14 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नवापूर तालुक्यातील 105 पैकी 97 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित 8 ग्रामपंचायतींमध्ये 16 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

शहादा तालुक्यातील 114 पैकी 109 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित 5 ग्रामपंचायतींमध्ये 15 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तळोदा तालुक्यातील 54 पैकी 53 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित 1 ग्रामपंचायतींमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

अक्कलकुवा तालुक्यातील 47 पैकी 46 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित 1 ग्रामपंचायतींमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

धडगाव तालुक्यातील 33 पैकी 34 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत.

अक्कलकुवा तालुक्यातील 47 पैकी 46 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत. उर्वरित 1 ग्रामपंचायतींमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

धडगाव तालुक्यातील 33 पैकी 34 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com