नंदुरबार जिल्हयातील धडगाव तालुका करोनामुक्त

नंदुरबार जिल्हयातील धडगाव तालुका करोनामुक्त
करोनामुक्त

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हयातील धडगाव तालुका कोरोनामुक्त झाला आहे. या तालुक्यात उपचार घेतलेले अखेरचे दोन रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, आज जिल्हयातील 27 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अक्कलकुवा तालुक्यातदेखील केवळ 4 रुग्ण असून हा तालुकादेखील कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत 2 लाख 7 हजार 499 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 67 हजार 689 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. 37 हजार 619 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आलेत आहेत.

यापैकी 36 हजार 559 रुग्ण करोनामुक्त झाले असून 944 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 113 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील 53, शहादा तालुक्यातील 20, तळोदा तालुक्यातील 13, नवापूर तालुक्यातील 23 तर अक्कलकुवा तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज जिल्हयातील 27 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 12, शहादा व नवापूर तालुक्यातील प्रत्येकी 6, तळोदा तालुक्यातील 1 तर धडगाव तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

धडगाव तालुक्यात दोन कोविड रुग्णांवर उपचार सुरु होते. हे दोन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या दोन्ही रुग्णांसोबतच धडगाव तालुका हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. सद्यस्थितीत या तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नाही.

दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातदेखील केवळ 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे रुग्णदेखील लवकरच कोरोनामुक्त होवून अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त होणार आहे. याशिवाय जिल्हयातील इतर तालुक्यांमध्येदेखील रुग्णसंख्या घटली असून जिल्हयात सध्या फक्त 113 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com