तीन महिन्यांनंतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आली सातशेवर

344 रुग्ण करोनामुक्त, 756 रुग्णांवर उपचार सुरु
तीन महिन्यांनंतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आली सातशेवर

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हयातील 344 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, तीन महिन्यांनंतर जिल्हयातील रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. सध्या 756 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत 1 लाख 92 हजार 626 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 53 हजार 300 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. 37 हजार 196 रुग्ण करोनाबाधीत आढळून आले आहेत.

आज जिल्हयातील 344 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याने कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात नंदुरबार तालुक्यातील 137, शहादा तालुक्यातील 56, नवापूर तालुक्यातील 41, तळोदा तालुक्यातील 54, अक्कलकुवा तालुक्यातील 27, धडगाव तालुक्यातील 29 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 35 हजार 644 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. 793 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज 527 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी 512 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 14 जण करोनाबाधीत आढळून आले आहेत. जिल्हयाबाहेर 193 रुग्ण दाखल आहेत. तर जिल्हयाबाहेरील 2 हजार 369 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com