जिल्हयातील तब्बल 2099 रुग्ण करोनामुक्त

जिल्हयातील तब्बल 2099 रुग्ण करोनामुक्त

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयातील शासकीय तसेच खाजगी कोविड सेंटरमध्ये दाखल असलेले तब्बल 2099 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्हयात 2 हजार 392 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज दिवसभरात तब्बल 19 रुग्णांचा मृत्यू झाल्यासने कोरोनाबळींची संख्या 706 झाली आहे.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत 1 लाख 73 हजार 583 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 लाख 34 हजार 961 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला. 36 हजार 366 रुग्ण करोनाबाधीत आढळून आले. 33 हजार 265 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात तब्बल 19 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्हयात 2 हजार 392 रुग्णांवर तर 337 रुग्णांवर जिल्हयाबाहेर उपचार सुरु आहेत.

आज जिल्हयातील तब्बल 2099 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com