लस न घेताच नागरिक परतले घरी

लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव
लस न घेताच नागरिक परतले घरी

सोमावल ता. तळोदा - Taloda - वार्ताहर :

शासनाकडुन लसीकरणाची गती व व्यापकता वाढविण्यावर भर दिला जात असतांना मात्र उपजिल्हा रुग्णालयात कनेक्टिव्हिटी व कोरोना प्रतिबंधात्मक लसीची साईट बंद असल्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहुन लस न घेताच घरी परतावे लागले.

यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .आरोग्य प्रशासनाने यावर पर्यायी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

करोना या जीवघेण्या महामारीतून बचावासाठी शासनाने 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे.यासाठी उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर अशा लसी दिल्या जात आहे.तथापि शासनाने नोंदणी करिता कोविंग नावाची वेब साईट सुरू केली आहे.

लाभार्थ्यांनी तेथे आपल्या मोबाईल न नोंदणी करायची असते.परंतु ही साईट शनिवारी बंद होती.त्यामुळे केंद्रावर गेलेल्या नागरिकांची गैरसोय झाली होती.

साधारण 150 नागरीक लस घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेले होते सदर केंद्र सकाळी 9 वाजता सुरू होत असले तरी नागरीक सकाळी सात पासूनच उपस्थित राहत असतात.

वास्तविक सातत्याने या केंद्रावर नेट कनेक्टिव्हिटीचा व्यत्यय येत असतो.त्यात पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी येथील प्रशासन वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करीत असूनही त्यांना दाद दिली जात नाही.

उलट वरूनच प्रॉब्लेम आहे असं सांगून आपली जबाबदारी झटकत असतात.एकीकडे सरकार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांच्या जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर जोर देत आहे.

तर दुसरीकडे यंत्रणेच्या उदासीन भूमिकेमुळे त्यात व्यत्यय आणला जात आहे असा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.आधीच नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत गैरसमज आहेत.साहजिकच लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे सांगितले जाते.

आता त्यांच्यातील गैरसमज दूर होवून नागरीक तयार होत आहेत.मात्र अधिकार्‍यांनी आता त्यात अडथळा आणल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.जिल्हा प्रशासनाने यात दखल घेवून साईट बंद होणे व त्यात अडथळा येण्यावर कायमच्या मार्ग काढावा अशी मागणी आहे.

लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव

उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर नियोजनाच्या फज्जा उडाल्याचे नागरीक सांगतात कारण सकाळी 6 वाजेपासून नागरिक टोकन घेण्यासाठी हजर राहतात . कर्मचारी 9 वाजता येतात व 11 वाजता नागरिकांना सांगतात की नेट नाही रजीस्ट्रेशन होत नाही . असे विविध कारणे सांगून परत पाठवतात याची सखोल चौकशी व्हावी, वरिष्ठ कोणीही हजर राहत नाही. कर्मचारी ऐकून घेत नाही असा नागरिकांच्या आरोप आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com