video : करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लस हीच संजीवनी

‘फेसबुक लाईव्ह’द्वारे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आवाहन
video : करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लस हीच संजीवनी

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

करोनाच्या लसींबाबत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून अनेक अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत.

मात्र, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसी अत्यंत सुरक्षित आहेत. ४५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने या लसी घेतल्यास शंभर टक्के करोनामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी होईल.

रेमडिसीवरचा आग्रह धरण्यापेक्षा लसीकरणाचा आग्रह धरला तर निश्‍चितपणे या लसी लोकांसाठी संजीवनी ठरणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर लसीकरण हाच एकमेव रामबाण इलाज असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे केले आहे.

लसीबाबत माहिती देतांना डॉ.भारुड म्हणाले, जिल्हयात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर १.५१ टक्के आहे. जिल्हयात ५२ ठिकाणी कोरोना लसीकरण सुरु आहे. त्यापैकी ३ खाजगी लसीकरण सेंटर आहेत. बर्‍याच लोकांमध्ये लसीकरणाबाबत अफवा आहेत.

आदिवासी समाजात प्रचंड गैरसमज आहेत. २२०६६ कर्मचार्‍यांना पहिला डोस दिला गेला असून ४५ वर्ष वयावरील ४१ हजार ५३८ आतार्पंत ६३५५४ लोकांना डोस दिला गेला आहे. अजूनही बर्‍याच लोकांनी पहिला डोस घेतला नाही. ही लस खर्‍याअर्थाने जीवनदायीनी, संजीवनी आहे.

आम्ही आतापर्यंत जेवढी माहिती गोळा केली आहे, त्यात लस घेतलेल्या अनेकांना संसर्ग झाला पण कोणत्याही व्यक्तीला गंभीर स्वरुपाचा त्रास जाणवला नाही. आजच्या स्थितीत प्रत्येक रुग्णालयात बेड शिल्लक नाही, ऑक्सीजन नाही, इंजेक्शनचा तुटवडा आहे.

मात्र, या सार्‍या गंभीर प्रकारापासून वाचण्यासाठी फक्त लसीकरण हाच पर्याय आहे. लस घेतल्यानंतर काही दिवस ताप येतो, याचा अर्थ लस शरीरावर परिणाम करत असते. त्यामुळे अँटीबॉडी तयार होतात. त्यातज कोणताही माणसू दगावत नाही.

ज्या लोकांना पहिला डोस दिला त्यापैकी कोणालाही गंभीर स्वरुपाचा त्रास झाला नाही. रेमडिसिवीर इंजेक्शनची गरज पडली नाही. ऑक्सीजनची गरज पडली नाही. घरच्या घरी अनेक जण बरे झाले.

यासाठी गावातील सरपंच, जि.प.पं.स. सदस्य, आमदार, पोलीस पाटील सर्वांनी गावातील लोकांमध्ये लसबद्दल असलेली भिती दूर करावी. आपल्या घरातील व्यक्तींना सुरक्षित ठेवायचे असेल तर लस नक्की घ्या.

कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी अत्यंत सुरक्षित व परिणामकारक आहेत. कोविशील्डमुळे २१ दिवसांमध्ये ७६ टक्के इम्युनिटी तयार होते. दुसर्‍या डोसनंतर ९० टक्के इम्युनिटी तयार होते. हा बुस्टर डोस असतो. परत अँटीबॉडी तयार होतात.

एकदा लस घेतल्यानंतर २१ दिवसांनी तो व्यक्ती दुसर्‍यांना पण व्हायरस पसरवू शकत नाही. म्हणजेच मृत्यू दर कमी करता येणे शक्य आहे.

कोव्हॅक्सीनमध्ये साईड इफेक्ट फार कमी आहेत. परंतू त्याच्यापासूनसुद्धा ८१ टक्के इम्युनिटी दोन तीन आठवडयात तयार होते. दुसर्‍या डोसनंतर ९० टक्केपर्यंत इम्युनिटी तयार होते. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, मुख्यमंंत्र्यांनी लस घेतली आहे, मी देखील घेतली आहे आणि माझ्या कुटूंबालादेखील लस दिली आहे.

खरे तर लस घेण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या पाहिजेत. मात्र, अफवेमुळे लसीकरणासाठी नागरिक पुढे येतांना दिसत नाही. माझी सर्व लोकांना विनंती आहे आपल्यासाठी, आपल्या कुटूंबासाठी आणि या समाजासाठी सर्वांनी लसीकरण करु घ्यावे. आताच्या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर लस हीच संजीवनी आहे रेमडिसिवीर इंजेक्शन नव्हे, असेही डॉ.भारुड यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com