खाजगी रुग्णालयांना 976 रेमडिसीवीर इंजेक्शनचे वितरण

खाजगी रुग्णालयांना 976 रेमडिसीवीर इंजेक्शनचे वितरण

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनातर्फे खाजगी वितरकाच्या माध्यमातून तीन दिवसात रेमडिसीवीर औषधाच्या 476 मात्रा खाजगी रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या.

याशिवाय प्रशासनाकडील 500 मात्रादेखील खाजगी रुग्णालयांसाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडे शासकीय कोविड रुग्णालयातील रुग्णांसाठी रेमडिसीवीरच्या 938 मात्रा शिल्लक आहेत.

रेमडिसीवीरच्या तुटवड्याच्या आणि अनियमित वितरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खाजगी रुग्णालयांना केंद्रीत पद्धतीने रेमडिसीवीर औषध पुरविण्याचा निर्णय घेतला होता. सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.

त्यानुसार 10 एप्रिल रोजी स्मित हॉस्पिटलला 100, निम्स 20, साई केअर 12, सार्थक कोविड सेंटर 6, सातपुडा कोविड हॉस्पिटल 138, भगवती क्रीटीकल 16, भगवती मल्टिस्पेशॅलिटी 12, आशिर्वाद हॉस्पिटल 12, धन्वंतरी हॉस्पिटल 6, चिंचपाडा क्रीस्तीयन हॉस्पिटल 12 आणि संवेदना कोविड सेंटर येथे 22 अशा एकूण 356 रेमडिसीवीर मात्रांचे वितरण करण्यात आले.

त्याचप्रमाणे 12 एप्रिल रोजी निम्स हॉस्पिटल, तुलसी हॉस्पिटल, सार्थक कोविड सेंटर , भगवती क्रीटीकल, सिद्धीविनायक मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल, आशिर्वाद हॉस्पिटल आणि चिंचपाडा क्रीस्तीयन हॉस्पिटलला प्रत्येकी 6 अशा 42 रेमडिसीवीर मात्रांचे वितरण करण्यात आले. 13 एप्रिल रोजी सार्थक कोविड सेंटर 12 , भगवती क्रीटीकल 12, सिद्धीविनायक मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल 4, चिंचपाडा क्रीस्तीयन हॉस्पिटल 10, सेंवदना हॉस्पिटल 10, आशिर्वाद हॉस्पिटल 12, शतायू हॉस्पिटल 12 आणि अशा एकूण 78 रेमडिसीवीर मात्रांचे वितरण करण्यात आले.

याशिवाय गंभीर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडील 500 रेमडिसीवीरच्या मात्रा उसनवारी तत्वावर खाजगी रुग्णालयांना देण्यात आल्या. त्यापैकी निम्स हॉस्पिटल 152, स्मित हॉस्पिटल 150, समृद्धी हॉस्पिटल 60, भगवती क्रीटीकल 20, सिद्धीविनायक मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटल 20, आशिर्वाद हॉस्पिटल 18, धन्वंतरी हॉस्पिटल 15, शतायू हॉस्पिटल 15, सार्थक कोविड सेंटर 10 , सातपुडा कोविड हॉस्पिटल 15, दारूल कोविड हॉस्पिटल 10 आणि कुलकर्णी कोविड हॉस्पिटलला 15 मात्रा वितरीत करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आता रेमडिसीवीरच्या 938 मात्रा शिल्लक आहेत.

त्यातून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com