पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी साधला करोनाबाधितांशी संवाद

पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी साधला करोनाबाधितांशी संवाद

नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयाला दिली भेट

नंदुरबार| प्रतिनिधी - nandurbar

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. त्यांनी पीपीई किट घालून कोरोना बाधित व्यक्तींशी संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे, अधिपरिसेविका निलिमा वसावे आदी उपस्थित होते.

कोरोना बाधितांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात. रुग्ण लवकर बरे होऊन घरी जातील यासाठी विशेष प्रयत्न करावे. कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अधिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. रुग्णालयातील सुविधा व गरजांबाबत त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली.

पालकमंत्र्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. रुग्णालयात चांगले उपचार होतील. रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com