जिल्हयातील 1103 रुग्ण करोनामुक्त

जिल्हयातील 1103 रुग्ण करोनामुक्त

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयातील 1103 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत 1 लाख 21 हजार 580 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 93 हजार 733 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

25 हजार 981 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. 17 हजार 270 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 424 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 8 हजार 284 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आज जिल्हयातील 1103 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यात नंदुरबार तालुक्यातील 547, शहादा तालुक्यातील 315, नवापूर तालुक्यातील 113, तळोदा तालुक्यातील 97, अक्कलकुवा तालुक्यातील 17 तर धडगाव तालुक्यातील 14 रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com