जिल्हयात करोनाचा कहर
नंदुरबार

जिल्हयात करोनाचा कहर

67 नवे रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसात तीनशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत.

आज नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे 67 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकुण कोरोना रुग्णांची 1 हजार 444 एवढी झाली आहे. दरम्यान, 16 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून खांडबारा ता.नवापूर येथील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

जून महिन्यांपर्यंत अत्यंत सुरक्षित असलेल्या नंदुरबार जिल्हयात गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दीड हजारावर पोहचली आहे. दररोज शंभरपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत असल्याने जिल्हयाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आज पुन्हा कोरोनाचे 67 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील 44, शहादा तालुक्यातील 15, नवापूर तालुक्यातील 5, तळोदा तालुक्यातील 1 तर जिल्हाबाहेरील दोन रुगणांचा समावेश आहे. त्यामुळे एकुण कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 444 एवढी झाली आहे.

दरम्यान, आज 16 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात पंधरा रुग्ण शहादा तर एक रुग्ण नंदुरबारातील आहे. त्यामुळे एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 818 झाली आहे. सध्या 568 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आज खांडबारा ता.नवापूर येथील 67 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे एकुण कोरोनाबळींची संख्या 56 झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com