नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यात करोनाचा उद्रेक होतांना दिसत आहे. त्यातच मृत्यू दरही वाढतांना दिसत आहे.जिल्ह्यात दोन दिवसात तब्बल ११ जणांचा कोरानामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान आज ३५२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातुन डिस्चार्ज देणयात आला आहे.तर आज १५३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. यातच मृत्यूदर कमालीचा वाढत असल्याने चिंता वाढत आहे.

गेल्या दोन दिवसात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.काल दि.२१ रोजी ५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.

तर आज पुन्हा ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.यात नंदुरबार शहरातील ६२ व ६३ दोन पुरूषांचा,व तालुक्यातील बह्याणे येथील ६३ वर्षीय पुरूष,शहादा तालुक्यातील भादा येथे ७५ वर्षीय वृध्देचा,सुतगीरणी येथील ६८ वर्षीय पुरष तर नवापूर तालुक्यातील वाकीपाडा येथील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे आतापर्यंत जिल्ह्यात २५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान आज नंदुरबार जिल्ह्यात आज ३५२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातुन डिस्चार्ज देणयात आला आहे.

यात नंदुरबार तालुक्यातील २२९, शहादा तालुक्यातील ८१, तळोदा तालुक्यात १६, नवापूर तालुक्यातील २३ तर धडगंव तालुक्यात १ रूग्णाचा समावेश आहे.

तर आज १५३ जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.यात नंदुरबार तालुक्यातील ४८,शहादा तालुक्यातील ७०,नवापूर तालुक्यातील ४,तळोदा तालुक्यातील २५ तर धडगांव तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

करोनाचा उद्रेक वाढत असतांनाही नागरीक मात्र बेफिकरपणे वागतांना दिसत आहेत. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करतांना दिसत नाही. याबाबत प्रशासनाने कडक पावले उचलत यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.