नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात शुक्रवारी तब्बल 112 करोना रुग्ण आढळून आले. तर 66 रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

नंदुरबार जिल्हयात कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक असून नागरिकांनी स्वतःच आपली काळजी घेणे अपेक्षित आहे.

नंदुरबार जिल्हयात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 112 कोरोना रुग्ण आढळून आले. यात नंदुरबार तालुक्यातील 37, शहादा तालुक्यातील 50, नवापूर तालुक्यातील 18, रुग्णांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हावासीयांसाठी चिंतेची बाब आहे. यासाठी नागरिकांनी स्वतःच काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, आज 66 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आतापर्यंत 64 हजार 282 संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

त्यापैकी 52 हजार 876 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. 10 हजार 249 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असून 9 हजार 283 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शुक्रवारी कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. यात प्रकाशा येथील 60 वर्षीय पुरुष, नंदुरबार येथील 62 वर्षीय महिला तर खर्डे ता.शिरपूर येथील 72 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हयात कोरोनामुळे 232 जणांचा बळी केला आहे. सध्या 731 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.