जिल्हयात 114 नवे करोना रुग्ण
नंदुरबार

जिल्हयात 114 नवे करोना रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे 114 नवे रुग्ण आढळून आले. तर तिघांना डिस्चार्ज देण्यात आला.

त्यामुळे एकुण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 हजार 354 इतकी झाली असून 802 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

नंदुरबार जिल्हयात आज कोरोनाचे 114 नवे रुग्ण आढळून आले. यात नंदुरबारातील 31, शहादा येथील 17, तळोदा येथील 14, नवापूर येथील 5 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज रनाळे ता.नंदुरबार येथील महिलेचा 17 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून या महिलेचा अहवाल काल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे एकुण कोरोनाबळींची संख्या 54 झाली आहे.

जिल्हयात आतापर्यंत 1 हजार 354 कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 802 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 453 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com