नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्ह्यात आज 78 जण करोनामुक्त झाले तर 47 जणांचे अहवाल कोराना पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान नंदुरबार व पळाशी येथील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 12 दिवसात कोरोना रूग्णांचा आकडा वाढतांना दिसत आहे. या 12 दिवसात 500च्या वर कोरोना रूग्ण आढळून आले आहे.

दि.12 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 78 रूग्ण कोरोनामुक्त आढळल्याने त्यांना कोविड कक्षातुन डिस्चार्ज देण्यात आला.

यात नंदुरबार तालुक्यातील 40, शहादा तालुक्यातील 17, नवापूर तालुक्यात 5, तळोदा तालुक्यात 14 तर धडगांव तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

दरम्यान आज जिल्ह्यात 47 जणांचे अहवाल कोराना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.यात नंदुरबार तालुक्यातील 15, शहादा तालुक्यातील 21, नवापूर तालुक्यात 1, तळोदा तालुक्यात 7 तर धडगांव तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

दरम्यान आज नंदुरबार शहरातील 84 वर्षीय पुरूष व पळाशी ता.नंदुरबार येथील 76 वर्षीय पुरूष यांचा कोरानामुळे मृत्यू झाला.

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 42 हजार 894 जणांचा स्वॅब घेण्यात आला. त्यापैकी 33 हजार 932 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 8 हजार140 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत 180 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 7 हजार 434 कोरोनामुक्त झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सद्या घडीला 523 जणांवर कोविड कक्षात उपचार सुरू आहे.