नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

नंदुरबार जिल्हयात सोमवारी एकाच दिवशी करोनाचे तब्बल 85 रग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे.

नंंदुरबार जिल्हयात आज सोमवारी 200 संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी तब्बल 85 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले.

यात शहादा तालुक्यातील 73, नंदुरबार तालुक्यातील 8, तळोदा व धडगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 तर जिल्हयाबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे.

एकाच दिवशी एवढया मोठया प्रमाणावर करोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, आतापर्यंत जिल्हयातील 39 हजार 888 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

त्यापैकी 31 हजार 785 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 7 हजार 395 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

6 हजार 756 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 469 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत.