नंदुरबार - Nandurbar - प्रतिनिधी :

जिल्हयात आज तब्बल 149 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला असून नवे 44 रुग्ण आढळून आले आहेत.

नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत 39 हजार 465 संशयित रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 31 हजार 477 रुग्णांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

7 हजार 343 रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. आज जिल्हयातील तब्बल 149 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला.

त्यात नंदुरबार तालुक्यातील 30, शहादा तालुक्यातील 88, अक्कलकुवा तालुक्यातील 7, नवापूर तालुक्यातील 14, तळोदा तालुक्यातील 7, तर धडगाव तालुक्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 6 हजार 695 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, आज जिल्हयात 44 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील 15, शहादा तालुक्यातील 18, नवापूर तालुक्यातील 5, तळोदा तालुक्यातील 3 तर अक्कलकुवा तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

सध्या 425 रुग्णांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकुण 165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.